Top News

चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा आणि पोलीस स्टेशन पोंभुर्णा यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिन साजरा.


Bhairav Diwase.    March 08, 2021
पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा येथे पोलीस स्टेशन पोंभूर्णा आणि चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स येथील महिला समूह आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती तर्फे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले.
  या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधीर हुंगे सर, प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुनिता खाडे, प्रमुख पाहुणे ठाणेदार श्री धर्मेंद्र जोशी, पंचायत समिती सभापती कु. अल्का आत्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. आम्रपली खोब्रागडे, माजी उपाध्यक्षा सौ. रजिया कुरेशी, माजी नगरसेवक सौ. सुनिता मॅकलवार, प्राचार्य डॉ. एन. एच. पठाण उपस्थित होते.

     पोलीस खात्यांकडून कु. अल्का आत्राम, सौ. आम्रपली खोब्रागडे, सौ. तारा लिंगमवार, आशावर्कर सौ. अर्पणा उराडे  चेताली मल्लेलवार (आविष्कार), सुहासिनी ढोले (क्रिडा), ललिता शिंदे (क्रिडा), प्रिती ढुमणे (योगा) यांचा महिला दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कार्यानिमित्त शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

तसेच चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, महिला समूह आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती तर्फे कु. अल्का आत्राम, सौ. आम्रपली खोब्रागडे, भुजबाना पठाण, सौ. रजिया कुरेशी, सौ. सुनिता मॅकलवार, यांचा उत्कृष्ट समाज योगदानासाठी सत्कार करण्यात आला. 

     ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांनी जेंडर सेंसीटायझेशन वर मार्गदर्शन करतांना आपले पोलिस खात्यातील बरेच अनुभव सांगितले. तसेच युवापिढीने सक्षमतेने आपली जबाबदारी सांभाळत, सामाजिक बंधन पाळत जिवनाची वाटचाल करावी. असे आवाहन केले.


      कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुनिता खाडे यांनी जेंडर सेंसीटायझेशन हा विषय कुशलतेने उपस्थितांना समजावला. तसेच विद्यार्थ्यांनी वयाचे भान न विसरता, कुठल्याही परिस्थितीत वाईट मार्गाचा अवलंब न करता. आपली शैक्षणिक वाटचाल करावी. असे उत्तम मार्गदर्शन केले.

    कु. अल्का आत्राम यांनी विद्यार्थीनींना यशोचित मार्गदर्शन केले. तसेच सौ. आम्रपली खोब्रागडे यांनी महिलांच्या उत्कृष्ट कार्य नियोजनासाठी प्रशंसा केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधीर हुंगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सगळ्या मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाची प्रशंसा केली. आणि विद्यार्थ्यांना आश्वासन दिले कि प्रत्येक त्यांच्या शैक्षणिक गोष्टींसाठी महाविद्यालय मदत करेल. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मेघा कुलकर्णी महिला समुह अध्यक्षा यांनी महिला समूह आणि अंतर्गत तक्रार निवारण समिती केंद्राचे उदिष्ट समजून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. चंद्रकांत वासेकर तसेच आभार प्रा. बाळासाहेब कल्याणकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सफलतेकरीता प्रा. वर्षा शेवटे, प्रा. वैशाली मुरकुटे, प्रा. सरोज यादव, सौ. ईश्वरी उराडे महिला समूह सदस्या, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने