Top News

प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव येथे कोविड लसीकरणाला झाली सुरुवात.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- आज दिनांक 8/3/2021 रोज सोमवारला प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव या ठिकाणि कोविड 19 ची लसीकरण देण्याची सुरवात करण्यात आली. लसीकरण झाल्यानंतर त्यांना अतिदक्षता म्हणजेच निरीक्षण कशामध्ये अर्धा तास ठेवण्याची वेवस्था करण्यात आले . लसीकरण करण्यापूर्वी प्रा.आरोग्य केंद्रच्या डॉ. तथा नर्स कर्मचारी यांनी ट्रैनिंग केली आहे. अशी प्राथमिक माहिती तिथल्या वैद्यकीय अधिकारी कु. डॉ. बोदले मॅडम यांनी दिली आहे.
ज्या ज्या लोकांनी पहिली लस घेतली त्यांनी 28 दिवसानंतर याच ठिकाणी म्हणजे प्रा. आरोग्य केंद्र नवरगाव इथे येऊन दुसरी लस घ्यावे असे सांगण्यात आलेलें आहे.जवळपास आज एकूण 50 लोकांच्या वर लोकांनी लस घेतली. 40वयापासून तर 70 वयाच्या सर्व लोकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावे असे सांगण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने