Top News

गडचांदूर येथे कोविड लसीकरण केंद्र चालू करा. भारतीय जनता पार्टी गडचांदूरच्या वतीने मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- महाराष्ट्रातच नव्हे तर सम्पूर्ण देशात कोरोनाने डोके वर केले.त्याला आटोक्यात आणण्याचा शासनाने पुरेपूर प्रयत्न करीत असतानाच आता कायम स्वरूप कोरोनाला नष्ठ करण्याच्या हेतूने शासनाने सम्पूर्ण देशात कोरोना लसीकरण चालू केले आहे व  आपल्या कोरपना तालुक्यात सुद्धा कोरपना येथे केंद्र चालू केले.परन्तु गडचांदूर हे शहर कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर असून 40 हजाराहून अधिक लोकसंख्येचे शहर आहे व येथील नागरिकांना 20 की मी अंतर गाठून कोरपना येथे लस घेणे शक्य नाही.त्यामुळे गडचांदूर शहराला स्वतंत्र लसीकरण केंद्र चालू करण्याची मागणी गडचांदूर शहर भाजपाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर, मा आरोग्य अधिकारी चंद्रपूर ,व मा शल्य चिकित्यक अधिकारी चंद्रपूर यांचे कडे निवेदन द्वारे करण्यात आली.यावेळी गडचांदूर भाजपा चे शहर अध्यक्ष सतीश उपलेंचिवार,नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे,शहर महामंत्री हरिभाऊ घोरे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने