छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सौंदर्य करणाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक गडचांदूर येथे सौंदर्य करणाच्या कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आले शिवप्रेमी व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे गेल्या वर्षी  जानेवारी 2020 मध्ये माजी आमदार संजय धोटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सौँदर्य करणाचे भूमी पूजन सोहळा पार पडला होता 2020 च्या नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाने अनेक कामांचे भूमिपूजन केले होते सत्ता परिवर्तन झाल्याने अजूनही काही कामे झालेले नाही  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे  सौंदर्य  करणाचे  भूमिपूजन माजी आमदार संजय धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर नगर परिषदेचे नगराध्यक्ष  मुख्याधिकारी  व सत्ताधारी पक्षांचे नगरसेवक पदाधिकारी शिवप्रेमी नागरिक  यांच्या देखत मोठ्या थाटामाटात भूमी पूजन सोहळा संपन्न झाला त्यानंतर एकाच महिन्यात  नगरपरिषदेच्या निवडणुका आल्या नगर परिषदवर काँग्रेस राष्ट्वादी काँग्रेस ची सत्ता आली व यात झालेल्या भूमीपूजनाचे  सर्व कामे  खोळंबली दिनांक 3/3/2021 ला पुन्हा नगर परिषद च्या सत्ताधारी पदाधिकारी गडचांदूर नगर परिषद च्या नगराध्यक्ष , मुख्यधिकारी व सर्व नगर सेवक,  शिवप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला
एकाच कामाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन हा मात्र चर्चेचा विषय खुप गाजत आहे दोनदा का होईना भूमिपूजन पण कामाला सुरुवात होणे  महत्वाचे असे उदगार मात्र अनेकांच्या तोंडून एकाला मिळाले कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले संपूर्ण काम हे पाच ते सहा महिन्यात पूर्ण होणार अशी माहिती मिळाली आहे. 


कलात्मक देखावा....
शिवमित्र परिवाराचे सदस्स श्री.गणेश वनकर यांच्या कलाकृतीतून  छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर देखावा  गडचांदूर शहरात पाहायला मिळणार आहे. आणि ही बाब आमच्यासाठी कौतुकास्पद आहे. असे मत शिवमित्र परिवाराने व्यक्त केले.