अडेगाव येथील श्रुती किशोर थाटे या निष्पाप मुलीच्या मृत्युसाठी जबाबदार असणारया त्या आरोपी कुटुंबावर आणी महावितरणच्या लाईनमन वर गुन्हा दाखल करणयाची मागणी.
यवतमाळ:- आज प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वणी येथील सक्रिय प्रहार सेवक अनिकेत चामाटे, नितीन गोरे यांनी अडेगाव येथील श्रुती किशोर थाटे या निष्पाप मुलीच्या बळी गेलेल्या कुटंबाची भेट घेतली. कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर थेट पोलिस स्टेशन गाठून प्रकरणाची सखोल चौकशी केली.आरोपींच्या विरोधात कुठलीच तक्रार दाखल नसल्यामुळे मुलीच्या कुटुंबाच्या मागणीनुसार आरोपीं विरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
आरोपी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यायची मागणी करण्यात आली. आरोपींवर कारवाई न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष वणी आंदोलन करण्यात येईल.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिकेत चामाटे,नितीन गोरे उपस्थित होते.