मेहनत आणि परिश्रम हीच यशाची गुरूकिल्ली. परीक्षा संचालक डॉ. अनिल चिताडे यांचे प्रतिपादन.

पदवी प्रमाणपत्र वितरण संभारंभ संपन्न.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- मानवी जीवनाच्या विकासासाठी नीतिमूल्ये आणि  संस्कार महत्त्वाचे असतात आणि हे सर्व शिक्षणातूनच प्राप्त होते. मेहनत आणि आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली असून शरदराव पवार महाविद्यालयाने विद्यादानासोबतच विद्यार्थ्यांना संस्कारही दिलेले आहेत  म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन आदर्श नागरिक बनावे असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी केले आहे.
  

    शरदराव पवार महाविद्यालयांमध्ये पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात डॉ.अनिल चिताडे उदघाटक  प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह, प्रमुख अतिथी म्हणून सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.आनंदराव अडबाले व संयोजक म्हणून समन्वयक  प्रा.डॉ.संजय गोरे प्रमुख्याने मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजय कुमार सिंह यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल मराठीतून व्यक्त केला. प्रमुख अतिथी डॉ. आनंदराव अडबाले यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले तर डॉ.संजय गोरे यांनी प्रास्ताविकातून समारंभाच्या आयोजनाची भूमिका विशद केली.
  
      याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक व प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवीचे सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले.महाविद्यालय आणि संस्थेच्या वतीने संचालक डॉ.अनिल चिताडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गोंडवाना विद्यापीठातून उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी म्हणून पुरस्कार प्राप्त महाविद्यालयाचे मुख्य लिपिक शशांक नामेवार व उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. शरद बेलोरकर तसेच समारंभाचे आयोजक आणि समन्वयक डॉ.संजय गोरे यांचा व  गोंडवाना विद्यापीठाच्या गुणवत्ता यादी मध्ये  आलेले महाविद्यालयाचे  विध्यार्थी आदर्श उपाध्ये  या सर्वांचा अतिथींच्या हस्ते शाल श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी तुळशीरामजी पुंजेकर, विनायकराव उरकुडे, माधवराव मंदे, तसेच सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग महाविद्यालयाचे विद्यार्थी,पदवीधारक विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.शरद बेलोरकर यांनी तर आभार प्रा.डॉ.हेमचंद दुधगवळी यांनी मानले. होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने पदवी वितरण समारंभाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने