(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) प्रफुल तुम्मे पाथरी, सावली
सावली:- सावली वन परिक्षेत्र अंतर्गत पाथरी उपवनक्षेत्रातील कक्ष क्रमांक 1679 मधे वाघाच्या हल्यात शेतकरी दादाजी पांडूरंग मस्के रा. डोंगरगांव वय 65 वर्ष हे ठार झाले. सदर घटनेची माहिती ग्रामस्थानी वनविभाग ला दिली त्यावरून वन अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देवून घटनास्थळी जाऊन पंचनामा करित आहे. या क्षेत्रात वाघाचा मोठा वावर असून शेतकरी या हल्या मुळे भयभीत झालेले आहे.