सावली तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत सरपंच विना कारभार.


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- मागील महिन्यात सावली तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक झाली व त्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण सोडत निघाली ,आणि तिन ट्प्पयात सरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली ,परंतु सरपंच पदाचे आरक्षण पडल्यानंतर तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये त्या प्रवर्गाचे उमेदवार नसल्याने सरपंच पद रिक्त ठेऊन उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली ,परंतु पाऊन महिन्यांचा कालावधी लोटुन जात असताना ही काही ग्रामपंचायतीचा सरपंच विना कारभार चाललेला दिसत आहे, 
    तालुक्यात ग्रामपंचतीची सार्वत्रिक निवडणुक व त्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण व सरपंच पदाची निवडणुक कार्यक्रम आटोपला परंतु यात सावली तालुक्यातील व्याहाड बुज,जिबगांव,लोंढोली,वाघोली बुट्टी,साखरी ,निमगांव, बेलगांव ,पारडी आदी ग्रामपंचायत मध्ये सरपंच विना कारभार दिसुन येत आहे, या ग्रामपंचायतीत जे सरपंच पदाची आरक्षित सोडत निघाली त्या प्रवर्गाचा निवडणुक आलेला सदस्य नसल्याने सरपंच पद रिक्त ठेऊन उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली .
        तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन तालुक्याचे तहसिलदार हे काम पाहत असतात ,त्यामुळे या ग्रामपंचायतीत नविन सुधारीत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करुन निवडणुक घ्यावी अशी एकमुखी मागणी संबंधित ग्रामपंचायतीतील सदस्यासर गावकरी करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या