चिंतामणी:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे आज दिनांक 20 मार्च 2021 ला जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम कॉलेजच्या बॉटनिकल गार्डन मध्ये घेण्यात आला. गार्डन मध्ये तसेच कॉलेज कॅम्पस मध्ये असलेल्या झाडांना चिमणीसाठी दाणेपात्र व पाणीपात्र अडकविण्यात आले. त्यात चिमणी साठी लागणारे दाणे व पाणी घालण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना या निसर्गासाठी चिमणी कशी महत्त्वाची आहे तेही सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी येता-जाता पात्रांमध्ये दाणापाणी असल्याची खात्री करावी असं सुद्धा बजावण्यात आलं. निसर्गातील प्रत्येक प्रजाती सृष्टीसाठी कशी महत्त्वाची आहे हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आलं. आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या प्राण्यांची, पक्ष्यांची व झाडांची काळजी घेण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांनी दिले. तसेच चिमणी दिवसाच्या निमित्त्याने विद्यार्थ्यांसाठी इको फ्रेंडली घरटे बनवण्याची स्पर्धा ठेवण्यात आली. ही घरटी पुढे झाडावर अडकविण्यात येणार आहे, जेणेकरून चिमण्या तिथे वास्तव्य करतील.
कार्यक्रमाला चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा चे प्रभारी प्राचार्य डॉ. हुंगे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनंत देशपांडे, कार्यक्रमाच्या आयोजिका डॉ. वैशाली मुरकुटे, प्राध्यापक जुमनाके व प्राध्यापिका तृप्ती मॅडम उपस्थित होत्या. covid-19 च्या नियमांचे पालन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.