चंद्रपुर:- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघांचे खासदार आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर आज कोरोना बाधित आढळले आहेत.
आमदार प्रतिभा धानोरकर कोरोना पॉझिटिव्ह.
कालच दिनांक 30 मार्च ला त्यांच्या आमदार पत्नी प्रतिभा धानोरकर पॉसिटीव्ह आढळल्यानंतर सर्व कुटुंबियांच्या तपासणी अहवाल आज प्राप्त झाला असून त्यात खासदार सुद्धा बाधित झाले आहेत. धानोरकर दांपत्य नागपुरात खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून संपर्कात आलेल्या सर्वांना तपासणी करून घेण्याचे कळविण्यात आले आहे.