Top News

क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा पुर्वत विराजमान करावे:- विजयजी सोयाम.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- भारतीय स्वातंत्र्याचे जनक व समस्त आदिवासी सामाजिक क्रांतीचे जनक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा समस्त भारतीय आदिवासिंचे दैवत असुन भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी दरवर्षी 15 नोव्हेंबरला त्यांच्या जन्मगावी जाऊन मानवंदना देतात. बिरसा मुंडा स्मारका करीता भारत सरकारने 51 कोटी रुपयाचे राची येथे स्मारकाचे काम सुरु केलेले आहे. समस्त आदिवासी समाजचे श्रद्धास्थान व प्रेरणास्थान असलेले क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा चंद्रपुर ईतिहासीक गोंड कॉलनी शहरात पुतळा असलेला.म.न.पा.प्रशासन चंद्रपुने हटविला त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यात समस्त आदिवासी समजात तिव्र असंतोष निर्माण झालेला आहे. चंद्रपुर जिल्हा बहुसंख्येने आदिवासीचे बांधव असतांना त्यांच्या समाजीक भावना दुखावल्या जात आहे. दि.27.02.2021 रोजी म.न.पा.प्रशासनाने कोणतीही सुचना न देता व मा.महापोर म.न.पा.चंद्रपुर यांना कोणतीही माहिती न देता पुतळ्याची उचल केली. त्यामुळे समग्र आदिवासी तिव्र जन असंतोष निर्माण झालेले आहे.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सिंदेवाही शाखेच्या वतीने सदर घटनेचा निषेध करण्यात आला. क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा नियोजित त्याच जागेवर पूनर्वत म.न.पा.प्रशासनाने बसवावे. ही मांगणी विजयजी सोयाम तालुकाध्यक्ष सिंदेवाही विकास परिषद. यांनी केली असुन मा.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाड़वी साहेब .चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे क्याबीनेट मंत्री अशोकजी नेते खासदार राष्ट्रीय महामंत्री अनुसूचित जमाती मोर्चा दिल्ली. प्रा.डॉ.अशोकजी उईके आमदार माजी मंत्री आदिवासी विकास,आयुक्त महानगर पालिका चंद्रपुर यांना प्रतीलिपी निवेदनाच्या पाठविल्या असुन क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा पुनर्वत जागेवर विराजमान करावे. संपूर्ण जिल्ह्यात जन आंदोलन करण्यात येइल असे कैलास कुंभरे जिल्हा संपर्क प्रमुख आदिवासी विकास परिषद. मधूकरजी पेंदाम आदिवासी सेवक, लोकेश मडावी ,वसंतजी सिडाम ,राजाभाऊ मेश्राम,आदिवासी विकास परिषद सिंदेवाही  यांनी केलेले आहे.व

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने