बांबु कारागीरांना निस्तार दरातुन हिरवे बांबू उपलब्ध करून द्या.

Bhairav Diwase
बांबू कामगारांची मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी पोंभुर्णा यांना दिले निवेदन.
Bhairav Diwase.    March 09, 2021
पोंभुर्णा:- तालुक्यात बांबु कामगार मोठ्या प्रमाणात आहेत.त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय हा सुप, टोपली, बनविण्याचा असुन त्या कामगारांना निस्तार दराने बांबु पोंभुर्णा डेपोमध्ये उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी बांबू कामगारांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
   
   पोंभुर्णा डेपोवर हिरवा बांबू उपलब्ध नसल्यामुळे अनेक कुटुंबावर संकट उभे ठाकले आहे. बांबू व्यवसायात पोंभुर्णा तालुक्यातील शेकडो कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. बांबू च्या वस्तू बनवून ते विकुण हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत आहेत.परंतू पोंभुर्णा डेपोमध्ये हिरवा बांबू नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे पोंभुर्णा डेपोमध्ये हिरवा बांबू उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी बुरड कामगारांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना चेतन बुरेवार, अशोक पद्मगीरीवार,शरद पद्मगीरीवार, अविनाश पद्मगीरीवार, सुनिता पद्मगीरीवार, विलास बुरेवार,कवडु बुरेवार,उषाबाई वासमवार, विजय तुराटे, सखाराम तुराटे, शांताबाई तुराटे,मिनाबाई कंदिकरेवार, लक्ष्मी तुराटे, सुलोचना जवादे व असंख्य बांबू कामगार उपस्थित होते.