Top News

२०१९ च्या ग्रा.पं. निवडणुकीचे मानधन त्वरित द्या; शिक्षक भारतीची मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- सन २०१९ मध्ये पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत मतदान अधिकारी म्हणून काम केलेल्या कर्मचा-यांचे मानधन अद्याप मिळाले नसून ते त्वरित देण्यात यावे,अशी मागणी शिक्षक भारती च्या चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे एका निवेदनाद्वारे येथील तहसीलदारांकडे करण्यात आली. 
             निवेदनात म्हटले आहे की, सन २०१९ च्या ग्राम पंचायत  निवडणुकीत कर्तव्यावर असलेल्या कर्म-यांचा मेहनताना अद्याप अप्राप्त असल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झालेला आहे. जिल्हाधिकारी यांनी मानधन त्वरित देण्याचे निर्देशीत केले आहे.तरी संबंधित कर्मचा-यांच्या खात्यात तात्काळ मानधन जमा करण्यात यावे.अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
    निवेदन सादर करताना शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भास्कर बावनकर, उपाध्यक्ष सुरेश मडावी, भद्रावती तालुका अध्यक्ष शैलेंद्र मेश्राम, सदस्य दीपक राठोड, शंकर ढुमणे, गजानन बोधाडे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने