मराठवाडा, विदर्भासह राज्यात चार दिवस गारपीटीसह अवकाळी पावसाची शक्यता.

Bhairav Diwase
0
Bhairav Diwase.       March 18, 2021
संग्रहित छायाचित्र
मुंबईः- गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पावसामुळे नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्यांवर आताही अस्मानी संकटाचे ढग घोंगावू लागले आहेत. १८ ते २१ मार्च दरम्यान राज्यात विजांचा कडकडाट आणि गारपीटीसह मध्यम स्वरूपाचा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पश्चिमेकडून येणारे मध्यमस्तरीय वारे आणि आणि पूर्वेकडून येणारे निम्नस्तरीय वारे यांच्या परस्पर आंतरक्रियेच्या प्रभावामुळे १८ ते २१ मार्च असे चार दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वीजांच्या कडकडासह मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस येण्यासाठी शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे व जळगाव जिल्हा, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड जिल्हा, विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोकणातील रत्नागिरी व रायगड जिल्हा आणि सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यात वीजांच्या कडकड आणि गारपीटीसह मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)