Bhairav Diwase. March 18, 2021
चिमुर:- शंकरपुर येथून जवळच असलेल्या कवडसी देश येथील चार वर्षाच्या मुलाचा बैलबंडीत दबल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे की, कान्हा जितेंद्र वंजारी खेळत असताना आपल्या शेतातील काम आपटून बाबुराव ढोणे यांनी बैलबंडी आपल्या घराकडे परत येत असताना खेळत असलेला कान्हा बैलबंडीच्या चाकावरून चढण्यास गेला असतांना तितक्याच बैल बुजाडले असता बंडीवर चढणारा कान्हा हा खाली पडला त्याच्या अंगावरून बैलबंडीचे चाक गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली घरच्यांनी उपचारासाठी शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चिमुर येथील रुग्णालयात पाठवले. पुढील उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. चिमूर येथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. त्याला एक सहा वर्षाच्या मोठा भाऊ असून या घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे.