ट्रकची पिकअपला, पिकअपची दुसऱ्या पिकअपला धडक.

Bhairav Diwase
0
Bhairav Diwase. March 18, 2021
चंद्रपूर:- घुग्घुसकडून चंद्रपूरकडे भरधाव जाणाऱ्या अज्ञात ट्रकने मिनी मालवाहू पिकअपला मागून धडक दिली. दरम्यान, समोरून येणाऱ्या पिकअपला या पिकअपने धडक दिली. यात दोन्ही पिकअप पलटी झाले. चालक जखमी झाला. सदर अपघात बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास नागाळा गावासमोर घडला. ट्रकचालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून पसार झाला.

जवान निखिल बुरांडे यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या. 
https://www.adharnewsnetwork.com/2021/03/blog-post_965.html?m=1

घुग्घुसकडून नागाळाकडे गुरांचा चारा घेऊन मिनी पिकअप (क्र. एमएच ३४ बीजी ५०८०) वळण घेत असताना मागून भरधाव येणाऱ्या अज्ञात ट्रकने जबर धडक दिली. त्या दरम्यान चंद्रपूरकडून घुग्घुसकडे येत असलेल्या दुसऱ्या पिकअपला (क्र. एमएच ३४ बिजी ८१८४) तो पिकअप आदळला आणि दोन्ही पिकअप रस्त्यावर उलटले. या अपघातात दोन्ही पिकअप वाहनातील वाहनचालक रमेश शेलवटे व सचिन लोनगाडगे हे किरकोळ जखमी झाले. या विचित्र अपघाताच तक्रार घुगूस पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)