पोंभूर्णा पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली दारू विक्रेत्यांविरोधात लेखी तक्रार.
पोंभूर्णा:- तालुक्यातील वेळवा गावात गेल्या सहा महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री चालू आहे. या दारू विक्री वर आळा घालण्यासाठी शिव शाही युवा मंच च्या नेतृत्वात गावातील महीलांनी पुढाकार घेवून मंगळवारी पोंभूर्णा उपपोलीस स्टेशन चे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या कडे लेखी तक्रार सादर केली.
जवान निखिल बुरांडे यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
गेल्या सहा महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री चालू आहे. वेळवा गाव तालूक्यातील दारूचा मोठा अड्डा बनलेला आहे. सकाळपासूनच अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी तळीरामांची रांग लागत असते, एवढेच नाही तर आष्टा, चेक आष्टा, सोनापुर, चेक फुटाणा, मोहाळा गावातील दारू शौकीन सुद्धा गावात दारू प्यायला येतात. सोबतच फोनवर सुद्धा सर्व वरील गावांना दारू पुरवठा केला जातो. गावासोबतच गल्ली-मोहल्ल्यातील वातावरण दुषीत होत चालले असुन आया बहीनींना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून या अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी शिवशाही युवा मंच च्या आणि ग्रामसंघाच्या वतीने गावातील संपुर्ण बचत गटांचा ठराव मागवण्यात आला. महीला बचतगटांनी अवैध दारू विक्री च्या विरोधात आवाज उठवला आणी पोलीस स्टेशन ला तक्रार देण्यासाठी तारीख नियोजीत करण्यात आली. नियोजीत तारखेनुसार आज शेकडो च्या संखेने महीला उपस्थित राहून शिव शाही युवा मंच च्या नेतृत्वात महीलांनी पोंभूर्णा उप पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या कडे लेखी तक्रार सादर केली. लेखी तक्रार सादर करताना शिवशाही युवा मंचाचे पदाधिकारी, ग्रामसंघाचे पदाधिकारी तथा गावातील संपुर्ण महीला बचत गटांच्या महीला हजर होत्या.