Top News

स्व. निखिल श्रावण बुरांडे (पॅरा कमांडो) यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.

स्व. निखिल पार्थिवावर मानोरा येथे होणार अंतिम संस्कार.
Bhairav Diwase. March 17, 2021
थोडक्यात........
बल्लारपूर:- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बल्लारपूर तालुक्यातील मानोरा या गावातील रहिवासी जवान निखिल श्रावण बुरांडे यांनी सकाळच्या सुमारास उत्तर प्रदेशातील आग्रा येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. जवान निखिलने आत्महत्या का केली? हे अजून अस्पष्ट असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

   हि घटना बुरांडे परीवारांना कळताच कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निखिलच्या जाण्याने कुटुंबाला धक्काच बसला. मानोरा गावात शोककळा पसरली आहे. निखिलच पार्थिव मानोरा येथे आणणार असून दुपारच्या सुमारास निखिलच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

सविस्तर वृत्त येणे बाकी.....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने