अचानक घरांना भिषण आग; आगीत दोन घरे जळाली.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.   March 31, 2021


चिमूर:- चिमूर तालुक्यातील मोठेगाव येथे पिण्याचे पाण्याचे टाकी मागील बेघर वस्तीत आज बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक घरांना आग लागली. त्यात मंगेश नेवारे, शेंडे नामक व्यक्तीचे घर आगीच्या कवेत जळल्याची घटना घडली. त्यात मोठीं आर्थिक हानी झाली आहे.

       या घटनेची माहिती आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी दूरध्वनी वरून संपर्क करून नगर परिषद चिमूर, नागभीड ची अग्निशामक दल मोठेगाव येथे रवाना केले आहे तर चिमूर नगरपरिषद अग्निशमन दलाचे वाहन पोहचले असून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यात मोठया प्रमाणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने नुकसान झाले आहे.