सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील "स्टुडंट्स युनिट ऑफ मायक्रोबायोलाॅजीस्ट सोसायटी इंडीया" आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण उपक्रम.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    March 26, 2021
पोंभुर्णा:- दि 25/03/2021 रोजी स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा येथे सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील "स्टुडंट्स युनिट ऑफ मायक्रोबायोलाॅजीस्ट सोसायटी इंडीया" आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण उपक्रम राबवण्यात आला.

    कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुधीर हुंगे, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, डॉ. मेघा कुळकर्णी , विभागप्रमुख सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, प्रा. पुनम मांडवकर ,  चिंतामणी कनिष्ठ महा. पोंभुर्णा, सुरज डुकरे , वरीष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक, महेद्र होडमाके कुष्ठरोग तंत्रज्ञ मंचावर उपस्थित होते.
    
     कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. अमोल गर्गेलवार को -कन्व्हेनर , स्टुडंट्स युनिट यांनी कार्यक्रमाचा उद्देश समजावून सागितला. श्री.सुरज डुकरे वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक यांनी वर्ग 11 आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना क्षयरोगाबददल सविस्तर माहिती दिली आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी मदत म्हणून क्षयरोगाची लक्षणे ज्या व्यक्तीमध्ये आढळतील त्यांची माहिती आशावर्कर कडे देण्याचे आवाहन केले. महेद्र शेडमाके कुष्ठरोग तंत्रज्ञ यांनी विद्यार्थ्यांना क्षयरोगाची चाचणी कशी केली जाते. त्याबद्दल मार्गदर्शन केले. 
     
    कार्यक्रमाला उपस्थित प्रा. पुनम मांडवकर यांनी अशा प्रकारचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांकरिता मौलाचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच अध्यक्ष डॉ. हुगे यांनी विद्यार्थ्यांना समाजासाठी रोगनिवारणसाठी आपले मौलाचे योगदान असल्याचे समजावून सांगितले. तसेच निरोगी राहण्यासाठी आवाहन केले.

   विभागप्रमुख प्रा. मेघा कुळकर्णी सुक्ष्मजीवशास्त्र आणि कन्व्हेनर स्टुडंट्स युनिट यांच्या मार्गदर्शनाचे आणि उपस्थितांचे आभार मानले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, चंद्रपुर यांचे सहकार्य बद्दल मानले. कार्यक्रमाला सफलतेसाठी सौ. ईश्वरी उराडे, प्रा. सतिश पिसे, प्रा. संतोषकुमार शर्मा, प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.