विषबाधेने दोन बैल ठार, शेतकऱ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर.

Bhairav Diwase
0

Bhairav Diwase.     March 11, 2021
संग्रहित छायाचित्र.....
बल्लारपूर:- हडस्ती येथे काल सुमारे दुपारी २ वाजेच्या दरम्यान नागेंद्र वचित्र आगीरकर हे आपल्या दोन बैलांना पाणी पाजण्यासाठी शेतात गेले होते. तेव्हा दोन्ही बैल विचित्र प्रकारे वावरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बैलांची प्रकृती ठीक नसल्याची त्यांना कल्पना आली. आगरीकर यांनी त्वरित गुरांना पाणी पाजण्यासाठी सोडले. बैलांना पाणी पिताच थरथराट सुटला. लगेच 10 मिनिटात गुरे जमिनी वरती पडले. एक बैल शेजारच्या शेतात धावत जाऊन पडला. क्षणभरात दोन्ही बैल गतप्राण झाले. लगेच शेतकऱ्याने जवळच्या पशु वैद्यकीय उपचार केंद्र काढोली ला संपर्क साधला. 10 ते 15 मिनिटात पशु वैद्यकीय परीचर यांनी धाव घेतली. घटनास्थळी पोहचताच त्या बैलांवरती प्राथमिक उपचार केला. मात्र तोपर्यंत दोन्हीही बैल मरण पावले होते. गुरांना श्वास घेण्यात त्रास होत असून वृध्यात सुजन असल्याचे त्यांनी संगीतले. विषबाधेमुळे दोन्ही बैल दगावल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच प्राथमिक उपचार करता दुपारी 3 च्या सुमारे दोन्ही गुरांनी आपले प्राण सोडले. संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून त्यांना शासनाने काही प्रमाणात आर्थिक मदत करावी असे मत गावातील नागरिकांनी व्यक्त केले. पोलीस पाटील किशोर मेश्राम तसेच सरपंच सौ. अंजलीताई पारखी यांनी मौका तपासणी केली व पोलीस पाटील यांनी गुरांच्या मृत्यूची नोंद घेतली!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)