"या" शहरात १५ ते २१ मार्च पर्यंत कडक लॉकडाऊ


Bhairav Diwase. March 11, 2021
नागपूर:- नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली. नागपूरमध्ये 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, असं नितीन राऊत म्हणाले. "नागपुरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार-रविवार बंदला म्हणजे मिनी लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला नाही. बाधित रुग्ण बाहेर पडत असल्याची माहिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन करावा लागत आहे", असं नितीन राऊत यांनी सांगितलं.

आम्हाला आता कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात येईल. मद्य विक्री बंद राहील. लसीकरण सुरू राहील. अत्यावश्यक सेवा सुरू राहील. डोळ्यांचे दवाखाने आणि चष्म्याचं दुकान सुरू राहील, असं नितीन राऊत म्हणाले.

नागपूर शहरात 14 तारखे पर्यंत मिनी लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचं दिसून आलं. शनिवार आणि रविवार दोन दिवस बंद ठेवण्याचं आवाहन प्रशासनाने करण्यात आलं होतं. याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत मार्केट बंद ठेवले मात्र रस्त्यावर विना कामाचे फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही, त्यामुळे नागपुरात आता पुन्हा 7 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1710 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही अनेक बेजबाबदार लोक मास्क घालायला तयार नाही. नागपूरच्या कॉटन मार्केट परिसरात निम्मे लोक सर्रास विनामास्क वावरतात. त्याचा परिणाम म्हणून नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने