(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- दिनांक 10/03/2021 रोज बुधवारला प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा या ठिकाणि कोविड 19 लसीकरण सत्राची सुरवात करण्यात आली. प्रथमत: वासेरा गावचे सरपंच महेश बोरकर आणि सिंदेवाही पंचायत समिती सदस्य शिलाताई कन्नाके यांचे हस्ते रिबीन कापून लसीकरण सत्राला सुरुवात करण्यात आली.
लस दिल्यानंतर लाभार्थ्यांना अतिदक्षता म्हणजेच निरीक्षण कक्षामध्ये अर्धा तास ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. लसीकरण करण्यापूर्वी प्राथमिक आरोग्य वासेरा वैद्यकीय अधिकारी तथा आरोग्य सेविका आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अशी प्राथमिक माहिती तिथले वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल गेडाम सर यांनी दिली आहे. ज्या ज्या लोकांनी लसीचा पहिला डोज घेतला त्यांनी 28 दिवसानंतर याच ठिकाणी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा येथे येऊन लसीचा दुसरा डोज घ्यावा असे सांगण्यात आलेले आहे.
130 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोज घेतला. या लसीकरण दरम्यान चहानदकर anm, पोडचलवार anm, सतीश बतकमवार jc, गणेश मडावी, उईके, नैताम मॅडम ha, मंजुषा, श्रुष्ठी, यामीना, कविता, मेश्राम कोविड योद्धा, प्रवीण मोहूर्ले सर , इत्यादी सहकार्य ने जेष्ठ नागरिक (वय 60 वर्ष) तथा 45 ते 59 या वयातील असणाऱ्या व्यक्तींनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे सांगण्यात आले.