गडचिरोली:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा गेल्या वर्षीपासून कोरोनाचे कारण देऊन शासनाने पुढे ढकलले आहे मात्र यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.आज दुपारी २ वाजता आयोगाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलली त्यामुळे राज्यासह जिल्ह्यातही विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला.
गडचिरोली शहराच्या मुख्य चौकात विद्यार्थ्यांनी सुरूवातीला शांत रीतीने शासनाचा निषेध केला मात्र प्रशासन याची दखल घेण्यास तयार नव्हते त्यामुळे काही वेळासाठी एमपीएससी विद्यार्थ्यांनी मुख्य रस्ते साखळी करून बंद केले त्यामुळे काही वेळासाठी सार्वजनिक सुव्यवस्था विस्कळीत झाली.
एमपीएससी चे विद्यार्थी सुरज कोडापे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी हा निषेध आंदोलन केला. रस्ता रोको झाल्या नंतर पोलीस प्रशासन यांनी येऊन विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्या जाणून शासनापर्यंत आम्ही तुमच्या निवेदनाचा पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
शासनाने विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ न करता परीक्षा वेळेत घ्याव्यात. अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन विद्यार्थी करतील. असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.