जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते मेडपल्ली येथे व्हॅलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.      March 16, 2021
अहेरी:- जय गोंडवाना क्रिडा मंडळ मेडपल्ली यांच्या वतीने ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेकरीता  पहिला, दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले असून कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पेरमिलीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.प.सदस्य प्रमोद आत्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, मेडपलीचे सरपंच निलेश वेलादी, ग्राम पंचायत सदस्या सौ.कल्पना तलांडे, भामरागड प.स.चे माजी सभापती लालसु आत्राम, माजी सरपंच तुकाराम वेलादी, माजी सरपंच सतीश वेलादी, व्ही.सी.कोंडागूर्ले, अशिफ शेख, जाकेवार, अरफज शेख, प्रशांत गोडसेलवार, प्रकाश दुर्गे, आदि मान्यवर मंचावर उपस्थिति होते.
सदर कार्यक्रमाप्रसंगी जि.प.अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की, गावात अनेक अडचणी व या क्षेत्रात अनेक समस्या आहेत मात्र या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी केव्हाच या भागात येत नसतात. गेल्या कित्येक वर्षापासून या क्षेत्रातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येत असतात मात्र निवडून आल्यावर मात्र या परिसराकडे दुर्लक्ष करत असतात त्यामुळे या परिसरातील सोईसुविधा जैसे थे आहेत अशी टीका केली. यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांनी सुध्दा अनेक समस्या बाबत सखोल अशी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेडपलीचे सरपंच निलेश वेलादी, संचालन व आभार सूरज मडावी यांनी मानले. यावेळी मंडळचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य तसेच गावातील महिला पुरुष व युवक उपस्थित होते.