दहावीचा विद्यार्थी कोरोना बाधित.

Bhairav Diwase
0
शाळा परिसर सात दिवस बंद.
Bhairav Diwase.      March 16, 2021
वरोरा:- सध्या कोरोना रुग्णांची संख्या वरोरा तालुक्यात झपाट्याने वाढत आहे, तरीही शालेय प्रशासन विशेषत: खासगी शाळा कोरोनाचे अधिनियम पायदळी तुडवत वर्ग घेतले जात आहे. त्यातच सराव व प्रात्यक्षिक परीक्षांची तारीख जाहीर केली. त्यामुळे विद्यार्थी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयात दैनंदिन हजेरी लावत आहे. शिक्षकही वर्गात जाऊन शिकवत आहेत, परंतु शासनाने वारंवार कोरानाचे नियम पाळण्याची सक्ती करीत आहे, परंतु याकडे शालेय प्रशासन दुर्लक्ष करीत वर्ग चालवीत आहे. अशातच वरोरा शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थेतील दहावीचा एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने वरोरा शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. याच परिसरात महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंची चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याला नामांकित शैक्षणिक संस्थेने परवानगी दिली, परंतु प्रशासनाची परवानगी होती की नाही? हे मात्र कळू शकले नाही, अशा बेजबाबदार वागणाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
दहावीचा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच, तो परिसर सात दिवस बंद ठेवण्याच्या सूचना शाळा प्रशासनास देण्यात आल्या आहेत.
रूपेश कांबळे, गटशिक्षणाधिकारी 
पंचायत समिती, वरोरा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)