वाघाच्या हल्यात गाय ठार.


Bhairav Diwase.    March 16, 2021
ब्रम्हपुरी:- मेंडकी ते जवराबोडी रोडच्या बाजुला दिनांक:-१५ मार्च २०२१ ला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मेंडकी वरूण जवराबोडी मेंढा जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला कोसा विकास कार्यालयाच्या जवळच वन विकास महामंडळ महाराष्ट्र कर्पांटमेंट नंबर ७६ क्षेत्रात १५ मार्च २०२१ ला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेलाच पाच-सहा जनावरे चरत असतांना तेजराम ढवळे यांच्या गायीवर वाघाने हल्ला करूण गायीच्या नरडीचा घोट घेत ठार केले.
    
        त्या वेळेस रस्त्यावरील लोकांच्या वर्दळीमुळे वाघ जंगलात पसार झाला. घटनेची माहीती तेजराम ढवळे यांनी वनविभाग, व fdcm च्या कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वणीद्वारे देऊन घटना स्थळी बोलाविले.
     
 सकाळी नऊ च्या सुमारास वर्दळी  रोडच्या लगतच गायीला ठार केल्याने लोंकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. एफ. डी. सी. एमचे गवई साहेब भिमराव पुनेकर, जगदीश मशाखेत्री यांनी प्रत्यक्ष पहाणी करूण घटणास्थळी ट्रॅप कॅमेरे लावन्यात आले. मानव हानी झाली नसली तरी प्राणी हानी होत असल्याने व वर्दळीचा रस्ता असल्याने संबंधीत वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी आवागमण करणाऱ्या  जनतेनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने