वाहनचोर मूल पोलीसांच्या जाळ्यात; 2 लाख 10 हजाराचा मुदेमाल जप्त.

Bhairav Diwase

Bhairav Diwase     March 15, 2021
मुल:- एका अट्टल वाहनचोरास मूल पोलीसांनी पकडले. त्याच्या कडून 2 लाख 10 हजाराचा मुदेमाल जप्त करण्यात आला. शहरामध्ये काल दिनांक 14 मार्च ला मध्यरात्री बाईक चोरी गेल्याची एका वकीलाने तक्रार दाखल केली त्या चोराला काही तासातच पकडकण्यात पोलीसांना मोठा यश आले असुन त्याचेकडून 3 मोटारसाईकल जप्त करण्यात आल्या आहेत.

          अॅड.सागर आंबटकर यांची घरासमोरुन बाईक चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्याकरीता पोलीस स्टेशन मुल मध्ये गेले असता पोलीस व डिबी पथकांनी तात्काळ दखल घेवून सदर बाईक चोरास सापळा रचून नागपुर रोड वर असलेल्या भाग्यरेखा सभागृहा समोर सावली तालुक्यातील सायमारा येथील रहिवासी विपूल प्रभाकर मेश्राम ला मोटार सायकल सह पकडले.  त्याला विचारपूस केली तेव्हा त्याने आणखी दोन मोटार साईकल चिमढा ण्टेकाडीच्या जंगलात लपवून ठेवल्याची  कबुल दिल्यानंतर तेही हस्तगत करण्यास पोलीसांना यश आले आहे. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावले आहे

       सदर गुन्हेगाराकडून मोटार सायकल क्रमांक एम एच 34 एक्स 5518 फोशन प्रो बाईक अंदाजे किंमत 70,000 मोटारसायकल क्रमांक एम एच 34 एक्यू 5128 अंदाजे किंमत 70,000 व हिरो सप्लेडर कंपनीची बाईक किंमत 70,000 अशा तीन मोटार सायकल एकूण किंमत 2 लाख 10 हजार चा मुदेमाल आरोपी कडून पंचनामा करून हस्तगत करण्यात आल्या. सदर कार्यवाही सहायक पोलीस अधिक्षक अनूज तारे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सतीशसिंह राजपूत व डि बि पथकाने केली.
 
      मुल शहरात चोरा-यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे पोलीसांनी रात्रौची गस्त वाढवून नागरीकांना दिलासा दयावा. अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.