वेळवा ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारा विरोधात युवा क्रांती मैदानात.

Bhairav Diwase
0
तुंबलेली नाली साफ करून निष्क्रियतेचा केला निषेध.
Bhairav Diwase.   March 16, 2021
पोंभुर्णा:- वेळवा ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी नागरिकांनी तुंबलेली नाली साफ करुन द्यावी अशा वारंवार तक्रारी केल्या होत्या. मागील महिनाभरापासून तक्रारीचे कोणतेच निरसन न करता सरपंच व सचिवांनी टोलवाटोलवी करीत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात होता. 
      सध्या कोरोना सारखी जागतिक महामारी संकट देशात असताना यात नागरिकांच्या स्वच्छतेची काळजी घेण्याचे काम येथील प्रशासनाचे असतांना सुद्धा वेळवा येथील शिवाजी चौकातील नाली तुंबलेली असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास झाली होती. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना बसण्यास त्यांचे आरोग्य धोक्यात येत होते. याची वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी व ग्रामपंचायत सदस्याकडून तक्रार देउन सुद्धा येथील निर्लज्ज व बेदखल प्रशासन उघड्या डोळ्यांनी तुंबलेली नाली पाहुन केवळ बघ्याची भुमिका बजावत होते. व ती नाली साफ करण्यास मजूर मिळत नाही म्हणून केवळ टोलवाटोलवी करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला गेला. त्यामुळे या वेळवा ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय व अडेलतट्टु धोरणामुळे नागरिकांत मोठा संताप निर्माण झाला होता. त्यामुळे येतील युवा क्रांती च्या युवकांनी नागरिकांच्या मुलभूत नैतिक अधिकाराचे हनन होत असल्याचे बघता युवा क्रांती च्या सर्व युवकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज या महापुरुषांचे विचार आत्मसात करून ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय धोरणा विरोधात शिवाजी चौकातील तुंबलेली नाली साफ करण्याचे व्रत हाती घेतले. व ती नाली पुर्णपणे साफ करुन नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. त्यामुळे युवा क्रांती दलाच्या युवकांनी मोलाचे कार्य केल्याचे मत गावात बोलल्या जात असून त्यांचे आभारही व्यक्त केल्या जात आहे.
     वेळवा ग्रामपंचायत प्रशासनाचा असाच निष्क्रिय व अडेलतट्टु कारभार जर भविष्यात राहिल्यास युवा क्रांती युवकांच्या माध्यमातून धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही असे मत दलाचे अध्यक्ष शुभम कुळमेथे, कार्याध्यक्ष विवेक इटेकार, सचिव नरेश कोवे, उपाध्यक्ष सचिन निमसरकार, संघटक पंकज वडेट्टीवार, कोषाध्यक्ष गुरुदेव मेश्राम, दशरथ कुभंरे, रोहित जाधव, गणपत लोणारे, आकाश जाधव, मुन्ना कुभंरे, वैभव कुळमेथे, रोशन कुळमेथे, संदीप गेडाम, गणपत कोवे, रजत वडेट्टीवार, विकास उंबरवार, रमेश कुळमेथे, प्रसाद कुकडेवार, सोनु राउत, सचिन केमेकार , आशिष भंडारे आदी युवा कार्यकर्त्यांनी इशारा केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)