जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत धनराज दुर्योधन प्रथम.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
चंद्रपूर:- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजाचे कार्य महान आहे.शिवाजी महाराजाच्या कार्याची,समर्पणाची प्रेरणा सतत मिळावी,शिवाजी महाराजाच्या स्मृती जपाव्या,त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा माहित व्हाव्या या उदात्त हेतूने मराठा सेवा संघ शाखा कोरपना जि.चंद्रपूर च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विषयावर आॅनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेसाठी एकुण चार गट होते. या चारही गटासाठी विविध विषय ठेवण्यात आले.गट क्र.४ साठी द मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराज हा विषय होता.या गटामध्ये धनराज रघुनाथ दुर्योधन यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बक्षिस वितरणाचा कार्यक्रम होऊ शकला नाही त्यामुळे त्यामुळे आयोजकानी घरपोच त्यांना एक हजार रुपये व सन्मानचिन्ह देवून गौरव केला.
    
      यापुर्वी धनराज दुर्योधन यांनी राज्यस्तरीय विविध स्पर्धेत प्रथम ,द्वितिय,तृतिय क्रमांकाचे अनेक बक्षिस मिळविले आहे.या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत या गटासाठी द्वितिय क्रमांक शीतल पानघाटे व तृतिय क्रमांक अंजली लांजेकर यांनी पटकावला उत्तेजनार्थ अंजली केळझरकर हिने पटकावला.