गोंडपिपरी जवळ ऑटो पलटला; एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    March 17, 2021
गोंडपिपरी:- गोंडपिपरी- बलारपूर मार्गावर आज दुपारी १ वाजता MH 34 D 6123 आटो हायवा ला ओव्हरटेक मारताना पलटला. त्यात पियुष देऊळगरे या जनता महाविद्यालयात शिकणाऱ्या १५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू  झाला आहे.

      तालुक्यातील करंजी येथील सचिन वाढई याच्या मालकीच्या आटोने प्रवाशांना गोंडपिपरी वरून करंजी नेत असताना सदर आटो हायवाला ओव्हरटेक मारताना पलटला. त्यात सर्व प्रवाशी करंजी येथील होते. एका १५ वर्षीय पियुष देऊळगरे युवकाचा जागीच मृत्यू झाला.

 या अपघातात करंजी येथील सोनी गणपत आत्राम वय (१०),चंद्रकला बावणे वय (६०) ,रामजी मरसकोल्हे माजी पोलीस कर्मचारी हे जखमी झाले असुन घटनास्थळी पीएसआय देवळे,गोंडपीपरिचे ठाणेदार संदीप धोबे यांनी जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरीत दाखल केले. एकुलता एक मुलगा गेल्याने करंजीत हळहळ व्यक्त केल्या जात आहे.पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहे.