भारतीय जनता युवा मोर्चा कडून सर्जील उस्मानी विरोधात निषेध आंदोलन संपन्न.

Bhairav Diwase
एल्गार परिषदेत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या  सर्जील उस्मानीवर गुन्हा दाखल करून अटक करा अन्यथा जिल्ह्यात सर्वत्र तीव्र आंदोलन घेण्यात येईल:- आशिष देवतळे.

भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे बल्लारपूर बस स्टँड चौक येथे शर्जील उस्मानी विरोधात निदर्शने करण्यात आले व तहसील कार्यालयात मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.
Bhairav Diwase.     March 17, 2021
बल्लारपूर:-अलिगढ मुस्लिम विश्वविद्यालयाचा विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी याने ३० जानेवारी २०२१ ला पुण्यातील एल्गार परिषदेत देशातील हिंदू समाजावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह टीका केली. त्याविरोधात त्याला त्वरित अटक करून त्याच्यावर २९५ (अ) व इतर तत्सम गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी आज बल्लारपूर शहरातील स्थानिक बसस्थानकाजवळ भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहीर व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
३० जानेवारी २०२१ ला पुण्यात भरवलेल्या देशद्रोही एल्गार परिषदेत येऊन अलिगढ मुस्लिम विश्वविद्यालयाचा विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी याने भारतातील हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करत  'आजचा हिंदू समाज हा सडलेला आहे" असे जहर ओकले. त्यामुळे संपूर्ण हिंदू समाजाच्या धार्मिक भावनेला त्याने ठेस पोहचविण्याचे काम केले आहे.
त्यामुळे या शर्जील उस्मानीला तात्काळ अटक करून त्याच्यावर २९५ (अ) आणि लागू होणारे तत्सम सर्व गुन्हे दाखल करण्यात यावे. अशी मागणी या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आली.
     त्यानंतर भाजयुमोच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात मा. तहसीलदार बल्लारपूर यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
यावेळी,बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीशजी शर्मा, कामगार आघाडी प्रदेश महामंत्री अजयजी दुबे, भाजयुमो शहर अध्यक्ष रनंजय सिंग, जिल्हा उपाध्यक्ष विषाल शर्मा,जिल्हा सचिव राहुल बिसेन, जिल्हा सचिव शिवाजी चांदेकर, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदित्य शिंगाडे,विद्यार्थी आघाडी जिल्हा महामंत्री प्रतीक बारसागडे ,गुलशन शर्मा, रिंकू गुप्ता, संजय बाजपेयी,प्रकाश दोतपेल्ली,मोहित डंगोरे, शुभम बहुरिया, विनय विश्वकर्मा, राजकुमार श्रीवास्तव, अदनान शेख, तुषार बहुरिया, साहिल बहुरीया, मानव वानपत्तीवार, गोलू ढोले, कुणाल सावजी, प्रतीक बहूरिया, कुणाल क्षीरसागर, रमेश बिश्वास, आदर्श सातपुते, राजू बहुरिया यांसह आदी युवा कार्यकर्ते तसेच स्थानिक मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते.