Top News

सिंगडझरी येथे मागीलवर्षी पासून नळ कनेक्शन बंद अवस्थेत.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील सिंगडझरी गट ग्रामपंचायत आहे.गावातील नागरिक या समस्येमुळे खूपच त्रस्त झाले आहेत.गावातील नळ कनेक्शन धारक ह्या समस्या वारंवार ग्रामसेवक,सरपंच यांना सांगितले. पण यांकडे कुणीच गांभीर्याने लक्ष देत नसून, नळ कनेक्शन ची समस्या ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना शुल्लक शी समस्या वाटत आहे. म्हणून ते या समस्येकडे कानाडोळा करतात असे लक्षात येत असून व जास्तीत जास्त  खिसे भर फुगणाऱ्या कामांकडे जास्त लक्ष देत असतात.

गावात ज्या प्रमाणे पाणीपट्टी कर वसुली केल्या जाते. त्या प्रमाणे मात्र सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. गावकऱ्यांनी हे त्यांच्या लक्षात वारंवार आणून  दिलं तरी फक्त करून घेऊ असं तोंडी आश्वासन देतात.यावर कुणी निगराणी ठेवणारा जबाबदार व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न  निर्माण झाला असून प्रशासनाणे काळजी पूर्वक लक्ष द्यावे असे सिंगडझरी येथील नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने