विद्यापीठ पदवी वितरण समारंभ संपन्न.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.     March 05, 2021
पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा त्याचप्रमाणे चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने 5 मार्च रोज शुक्रवारला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत  विद्यार्थ्यांना पदवी वितरणाचा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये पार पडला. 

https://www.facebook.com/154681593012225/posts/188746419605742/?sfnsn=scwshmo

      या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोंभुर्णा तहसिल कार्यालयाचे तहसीलदार श्री. निलेश खटके सर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. टी. एफ. गुल्हाने सर, त्याचप्रमाणे श्री सुनिल शेरकी सर सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, प्राचार्य डॉ. एन. एच.पठाण सर, डॉ. सुधीर हुंगे सर हे उपस्थित होते. 
      
     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. निलेश खटके सर यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये महाविद्यालयाचे महत्व समजावून सांगून भविष्यामध्ये येणाऱ्या संकटावर शिक्षणाने कशी मात केल्या जाते ते समजावून सांगितले.
     
       त्याच प्रमाणे कार्यक्रमाचे पाहुणे श्री. सुनिल शेरकी सर यांनी पदवी वितरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. टी. एफ. गुल्हाने सर यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या काळात टिकायचे असेल तर जागृत राहावे लागेल आणि शिक्षणाच्या  लाटेवर स्वार व्हावे लागेल. हे समजावून सांगितले त्याप्रमाणे कार्यक्रमाचे पाहुणे डॉ. एन. एच. पठाण सर व डॉक्टर सुधीर हुंगे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. 
       
      पदवी वितरण कार्यक्रमांमध्ये चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा त्याचप्रमाणे चिंतामणी कॉलेज आॉफ कॉमर्स पोंभूर्णा च्या विद्यार्थ्यांना पदवी वितरित करण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. वैशाली मुरकुटे यांनी केले. प्रस्तावित डॉ. पूर्णिमा मेश्राम यांनी केले तर आभार प्रा. ओमप्रकाश सोनोने सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.