गोंडपिपरी:- नळाच्या पाण्यातून जिवंत मासोळ्या येत असल्याचा प्रकार धाबा येथे घडत आहे. मागील काही दिवसापासून दुषित पाण्याचा पुरवठा सूरू आहे. परिणामी गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
धाबा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतुन धाबा गावाला पाणी पुरवठा केला जातो. मात्र ठेकेदाराचा गलथान कारभाराचा फटका सामान्य जनतेला भोगावा लागत आहे. आज (शुक्रवार ) नळाचा पाण्यातुन चक्क जिवंत मासोळ्या बाहेर आल्यात. गावातील भिकारू जूनघरे यांनी भांड्यात भरलेल्या पाण्यात मासोळ्या दिसून आल्यात. पाणी शुध्द न करताच पाणी पुरवठा केला जात असल्याने गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे.