चिंतलधाबा बिटातील घटना.
पोंभुर्णा:- तालुक्यातील चेक आष्टा येथील पुरुषोत्तम मडावी ( 52 वर्ष ) काल दि. 04/03/2021 ला चेक आष्टा फाट्यानजीच्या तलावात बैलाला पाणी पाजण्यासाठी गेले होते. त्यांच्या सोबत आणखी ३ व्यक्ती होते. संध्याकाळी सुमारे ५.३० वाजता पुरूषोत्तम मडावी अचानक गायब झाला.
सदर व्यक्ती रात्रौ पर्यंत घरी न आल्याने गावातील नागरिकांनी काल रात्रौ दि. 04/03/2021 ला 8:00 वाजताच्या सुमारास जंगलात शोधाशोध केली असता. तो व्यक्ती सापडला नाही.
आज दि. 05/03/2021 ला सकाळी पुन्हा गावातील व वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केली असता चिंतलधाबा बिटातील कक्ष क्र. 96 राखीव जंगलात वाघाच्या हल्ल्यात पुरुषोत्तम मडावी ठार झाल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी गाेंडपिपरी ला पाठविण्यात आले.
वनपरिक्षेत्र अधिकारी खोब्रागडे, Acf कोडापे, वनक्षेत्र अधिकारी यादव, वनरक्षक आर जी मेश्राम, ठाणेदार धर्मेंद्र जोशी, सरपंच कांताबाई मडावी, उपसरपंच जगन येलके, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष देवराव कडते उपस्थित होते. मृतकाच्या परीवाराला वनविभागाकडून तातडीची आर्थिक मदत देण्यात आली.
मृतकाच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, नातू व बराच मोठा परीवार आहे. मृतकाच्या परीवाराला २० लाखांची मदत व नोकरी देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.