वरोरा भाजपाने केले निषेध आंदोलन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) ईश्वर नरड, वरोरा
वरोरा:- येथील भारतीय जनता पार्टी,वरोरा तालुका तर्फे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री मा. हंसराजभैया अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबेडकर चौक वरोरा येथे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा किंवा त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, या मागणीला घेऊन जोरदार निदर्शने करण्यात आली.
"राज्य शासनाचा निषेध आंदोलनात भाजपा, महिला मोर्चा व भाजयुमो च्या पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. ठाकरे सरकारच्या १६ महिन्याच्या कालखंडात,४ मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले. आणि आता १००कोटी रुपये प्रतिमाह वसुलीच्या आदेशाचा खुलासा होतोय. ही बाब लोकशाहीला काळिमा फासणारी आहे.ही लोकशाही नसून ठोकशाही आहे. मुख्यमंत्र्यांनी ना. देशमुखचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्रांना मेल पाठवूनच नाही तर प्रत्यक्ष १००कोटी रु वाझे यांना वसुली करण्यासाठी ना. अनिल देशमुख यांनी सूचित केल्याची माहिती दिली. तरीही मुख्यमंत्री गप्प आहेत.त्यामुळे पूर्ण महाविकास आघाडीचा यात सहभाग नाकारता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी ना. अनिल देशमुख यांनी मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी ओमभाऊ मांडवकर तालुका महामंत्री ,बाबा भाऊ भागडे ज्येष्ठ नेते भाजपा, डॉ गायकवाड साहेब जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, अहेतेश्याम अली नगराध्यक्ष वरोरा ,सचिन नरड जिल्हा महामंत्री भाजयुमो, सुरेश महाजन शहराध्यक्ष वरोरा, सायरा शेख महामंत्री जिल्हा महिला आघाडी, शुभांगी निंबाळकर, वंदनाताई दाते पं स सदस्य, खुशाल सोमलकर पं स सदस्य, विनोद लोकरे माजी नगराध्यक्ष, दिलीप घोरपडे बांधकाम सभापती, महेश श्रीरंग जिल्हा सचिव भाजयुमो, राहुल बांदुरकर वरोरा भद्रावती विधानसभा सोशल मीडिया प्रमुख, श्रीकांत पेचे, ईश्वर नरड, संजु राम, अमित आसेकर, निलेश देवतळे प्रतीक काळे, महेश देवतळे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.