Click Here...👇👇👇

भद्रावती शहर व परिसरातील वाढत्या अवैध धंद्यांना आळा घाला.

Bhairav Diwase
भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहर व परिसरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यात यावा अशी मागणी भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया तर्फे येथील तहसीलदार व ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनातून नुकतीच करण्यात आली आहे. 
      
         तहसीलदार व ठाणेदार यांना सादर केलेल्या निवेदनानुसार, भद्रावती शहर व परिसरात दारु, मटका, जुगार, भंगार, सुगंधीत गुटखा, गोमांस विक्री इत्यादी अवैध धंद्यांनी कळस गाठला असतानाच देहविक्री व्यवसायाची  पायाभरणी काही समाजकंटकांनी सुरु केली. त्यामुळे भद्रावती देवनगरीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. याचा वेळीच बंदोबस्त करुन परिस्थिती नियंत्रणात आणावी व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. 
            
         निवेदन सादर करताना नागेंद्र चटपल्लीवार, सुनील रामटेके, जितेंद्र गुलानी, सर्फराजखाॅं पठाण आणि विजय सपकाळ उपस्थित होते.