पोंभुर्णा:- दिनांक 8 मार्च 2021 ला चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा येथे महिला समूह, अंतर्गत तक्रार निवारण समिती, तसेच पोलीस स्टेशन पोंभुर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पठाण सर होते. तर प्रमुख मार्गदर्शक माननीय धर्मेंद्र जोशी सहाय्यक पोलीस निरीक्षक पोंभुर्णा, प्रमुख अतिथी सौ. आम्रपाली खोब्रागडे वनपरिक्षेत्र अधिकारी पोंभुर्णा, कु. अल्का आत्राम सभापती पंचायत समिती पोंभुर्णा, माजी उपाध्यक्ष रजिया कुरेशी, माजी नगरसेविका सौ सुनीता मॅकलवार, प्रा. सुनिता खाडे उपस्थित होते.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे, माजी उपाध्यक्षा रजिया कुरेशी, माजी नगरसेविका सौ सुनिता मॅकलवार, सभापती कु. अल्का आत्राम पं. स.पोंभुर्णा यांचा सत्कार करण्यात आला.
कु. अल्का आत्राम यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात झेप घेण्याचा सल्ला दिला. प्रत्येक व्यक्ती ही कर्तुत्वाने मोठी होत असते, कर्तुत्वाने ओळखली जाते. किती संपत्ती आहे म्हणून नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थी स्वतःला सिद्ध केले पाहिजे असा सल्ला दिला. सौ. आम्रपाली खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांनी योग्य वेळी योग्य काम केले पाहिजे. आणि मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे असा सल्ला दिला. मा. धर्मेंद्र जोशी यांनी विद्यार्थ्यांने मोबाईलच्या आहारी न जाता, जीवन यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले पाहिजे, तरच जीवनात यशस्वी होऊ शकतो असा मोलाचा सल्ला दिला. प्रा. सुनीता खाडे यांनी विद्यार्थ्यांनी फॅशनच्या आहारी न जाता विद्यार्थ्यांप्रती असणारी कर्तव्य जबाबदारी यांचे भान ठेऊन कर्तव्य केले पाहिजे. या बाबी विषयी आचरण केले पाहिजे असा सल्ला दिला अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पठाण यांनी wants आणि needs मधील फरक ओळखण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. गुडधे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. नरवाडे यांनी तर आभार डाॕ .गिरीपूंजे यांनी मानले.