महासमृद्धी महीला सक्षमीकरण अभियानाचे जिवती पंचायत समिती सभापती सौ. अंजनाताई पवार यांच्या हस्ते उद्घाटन.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कक्ष जिवती अंतर्गत पंचायत समिती सभागृहात उमेद अभियानाची यशस्वी वाटचाल सुरू करण्यासाठी महासमृद्धी महीला सक्षमीकरण अभियानाची उद्घाटनीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले व ग्रामविकासामध्ये महीला सक्षमीकरण हा महत्त्वाचा विषय समाजाच्या मुख्य प्रवाहात आणुन त्यांचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक व राजकीय असे सर्वांगीण सक्षमीकरण करणे आवश्यक आहे या साठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे हे महासमृद्धी अभियान ३ महीने चालणार असून यांच्या माध्यमातून सर्व महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
या उद्घाटनीय कार्यक्रमांचे अध्यक्ष पंचायत समिती सभापती सौ अंजनाताई पवार प्रमुख मार्गदर्शक महीला बालविकास अधिकारी श्नी गारूडे साहेब जिवतीचे ठाणेदार श्नी संतोष अंबिके साहेब संरक्षण अधिकारी श्नी प्रविण शेख सौ. बारापात्रे मॅडम श्नी मनोज मेश्राम सर उपस्थित होते तर कार्यक्रमांचे सुत्रसंचलन सौ सावित्रीताई राठोड प्रस्ताविक श्नी मनोज मेश्राम आभार प्रदर्शन सौ गीतांजली रावणकोले अंशान चालखुरे श्नी रविंद्र वाढई हरिदास आहेर पंकज भाऊ मनोज किन्नाके स्वप्निल राठोड सुरेश खोब्रागडे प्रविण कृष्णघाडकर सुनील राठोड प्रेमदास पवार व सर्व पदाधिकारी या वेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते