नविन बस स्थानक जवळ असलेल्या तलावात महिलेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

Bhairav Diwase

Bhairav Diwase. March 09, 2021
मुल:- मूल तालुक्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञान महिलेचा psi राठोड साहेब यांच्या सहकार्याने निखिल वाढई आकाश येसनकर, प्रणित पाल करण डोर्लीकर, रोहित शेंडे यांनी जिव वाचविले.

 मिळालेल्या माहितीनुसार आज मुल तालुक्यात घरच्या वादामुळे ६:३० वाजताच्या सुमारास एक महिला नविन बस स्थानक जवळ असलेल्या तलावात उडी घेण्यासाठी आली होती. आकाश येसनकर याच्या मित्राला हि बाब समजता त्यांनी आकाश ला फोन वरुन संपर्क साधला. त्यानंतर लगेच निखिल वाढई आकाश येसनकर, प्रणित पाल करण डोर्लीकर, रोहित शेंडे यांनी नविन बस स्थानकाकडे धाव घेतली. व त्या महिलेला समजवण्याचा खुप प्रयत्न केला. पण ति महिला टसमजायला तयार नव्हती. त्यानंतर त्यांनी मुल पोलिस स्टेशन ला संपर्क साधला असता psi राठोड साहेब यांनी नविन बस स्थानकाकडे धाव घेतली. व त्या महिलेला समजविले असता. त्या महिलेनी जिव दिल्याचे टाळले.