(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- येथील नगर परिषदेने लावलेल्या नर्सरीला भीषण आग लागल्याने अनेक झाडांचे नुकसान झाले आहे. येथील पिंडोनी स्मशानभूमिच्या बाजुला न.प.चे एक उद्यान आहे. याच उद्यानाच्या बाजुला न.प.ने विविध प्रजातींची झाडे लावून 'एक कदम पर्यावरण रक्षा की ओर' हे महत्वपूर्ण कार्य केले. या झाडांच्या भोवती असलेल्या वाळल्या गवताने शुक्रवारी दुपारी १ ते १.३० वाजताच्या दरम्यान अचानक पेट घेतला. त्यानंतर नर्सरीतील पूर्ण गवत आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेची सूचना न.प.ला देण्यात आली. त्यानंतर न.प.कर्मचा-यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली.आगीच्या ज्वाळामुळे उभी झाडे काही प्रमाणात भाजल्या गेली.