चामोर्शी:- गडचिरोली जिल्ह्यातील युवा संकल्प ही संस्था संपूर्ण जिल्हा मध्ये गाजत आहे. त्यांचे काम व समाजामध्ये एकत्रित येऊन सर्वांना मदत करणे हे सद्या गडचिरोली जिल्ह्यात लोकप्रिय होत आहे. कृषी बाजार समिती च्या उजव्या बाजूनी जाणाऱ्या सिमेंट काँक्रेट रोड ला लागून दोन नाल्या आहेत. त्या मध्ये एक नाली सिमेंट पाट्यांनी झाकलेले आहे तर दुसरी नाली मोकडी पडली आहे.अश्या मध्ये एक म्हैस त्या मध्ये अडकली तीला बाहेर पडताच येत नव्हत. अशी माहिती युवा संकल्प ग्रुप चामोर्शी ला मिळतातच. तुरंत तिथे पोहचून त्या म्हैसला ला सुखरूप बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले. काही वेळाने म्हैसला बाहेर काळण्यात आले. आणि म्हैस ला त्याच्या मालका कडे सुखरुप पोहचवून देण्यात आले. अशा मोकळ्या नालीत मुके जनावरे तसेच व्यक्तीचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे. लवकरात लवकर त्या नालीच बांधकाम पुर्ण करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
त्यावेळी उपस्थित युवा संकल्प ग्रुप चामोर्शी चे प्रमुख सुरज नैताम, सदस्य राहूल चिचघरे, स्वप्निल चिचघरे श्रावणजी, नवले सोमेश्वर आत्राम, सुरेश आत्राम, राजू दुधबावरे, भारत वैरागडे, शंकर गव्हारे, मारोती नवले, आकाश गडकर, विक्की बारसागडे, हर्षल धोडरे, ओकटू उदिंवाडे, गोपाल नदेश्वर, डाँ,विशाल सहारे, अश्विन बोदलकार, वर्षाताई सहारे, अल्काताई नैताम, शेंवनताबाई नवले आणि गावकरी लोक उपस्थित होते.