Top News

शेतमजुराचा मुलगा निरज देशसेवेसाठी सज्ज.

वडिलांच्या निधनानंतर जिद्दीने मिळवले यश.
Bhairav Diwase.     March 13, 2021
पोंभुर्णा:- घरची परिस्थिती हलाकीची जेमतेम २ एकर शेती. घरच्यांवर शिक्षणासाठी काढलेले कर्ज. मोठा भाऊ आर्मीत लागल्यामुळे घरची परस्थिती बदलणार या विचारात असताना वडिलांचे निधन. अशा स्थितीत निरज मनोहर ढोंगेने जिद्दीने मिळवलेले यश प्रेरणादायी आहे.
                
        निरज चे प्राथमिक शिक्षण मुल तालुक्यातील मूळ जन्मगावी पिपरी दिक्षित ला झाले. महाविद्यालयीन शिक्षण मूल ला झाले. अशातच हातावर आणून पानावर खाणे अशी परिस्थिती असल्यामुळे पुढील पदवी यशवंतराव मुक्त विद्यापिठातून शेती सांभाळत तसेच मजुरी करत मिळवली.
             
           मोठा भाऊ सुरज ढोंगे इंडियन आर्मीत दाखल झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. कुटुंबात आई-वडील दोन भाऊच असल्यामुळे गोड स्वप्न रंगवू लागली. स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल असताना नशिबात जे असते ते घडत असते म्हटल्याप्रमाणे वडिलांचा २०१९ मध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. एका चार चाकी वाहनाने त्यांना दुचाकी ने जात असताना मागून धडक दिली. होत्याच न्हवत झालं.
               
         त्यात आईची तब्बेत साथ देत नव्हती घरची जबाबदारी निरजवर आली. भरतीचा सराव सोडून शेती सोबत मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करू लागला. पण म्हणतात न "हातावरच्या रेषा बदलवायच्या असतील तर नशीब असावे लागते. आणि प्रयत्नात धमक असली की नशीबालाही माणसासमोर झुकावे लागते". याच शब्दांवर विश्वास ठेवून निरज ने भरती चा सराव सोडला मात्र प्रयत्न सोडले नव्हते.
  
             त्यांनी पुन्हा सीआरपीएफ ची भरती दिली फिजिकल दिली व २० फेब्रुवारी ला निकाल लागला त्यात निरजची निवड झाली. त्याच्या मेहनतीला यश प्राप्त झाले. मिळालेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून यशाचे श्रेय आई छोटा भाऊ व स्व.वडिलांना दिले आहे.
आई वडीलांचे कष्ट व त्याग डोळ्यांपुढे होते. अनेकदा भरतीत अपयश आले. तरीपण मनात आत्मविश्वास व जिद्द असल्यामुळे यश मिळवता आले.
निरज ढोंगे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने