पोंभूर्णा:- पोंभूर्णा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार म्हणून धर्मेंद्र जोशी रुजू झाल असून त्यांना नुकताच पदभार स्वीकारला आहे. पोंभुर्णा पोलिस स्टेशनचे ठाणेदार नाईकवाड यांची नागपूर सिटी पोलिस स्टेशन ला बढती वर बदली झाल्याने त्यांच्या जागी बल्लारपुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक धर्मेद्र जोशी हे रुजू झाले आहे. तालुक्यात सर्वत्र अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या अवैध धंद्यावर आळा घालून परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन नवे ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्यासमोर असणार आहे. हे आव्हान हे कसे पेलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोंभूर्णा पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार धर्मेद्र जोशी रुजू.
मंगळवार, मार्च ०२, २०२१
0