Top News

दुचाकीची बैलबंडीला धडक, युवक जागीच ठार.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- दुचाकीची बैलबंडीला धडक बसून युवक जागीच ठार होण्याची  घटना दि.१२ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भद्रावतीपासून जवळच असलेल्या टाकळी फाट्यावर घडली. 

            प्रमोद पुरुषोत्तम कुळमेथे (२९) रा. शिवनगर भद्रावती असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या दुचाकी मोटरसायकल क्र.एम.एच.३४, ए.एक्स.६२४८ ने हिंगणघाटवरुन भद्रावतीला परत येत होता. दरम्यान, टाकळी फाट्याजवळ त्याच्या दुचाकीची समोर जाणा-या बैलबंडीला जोरदार धडक बसली.त्यात प्रमोद गंभिर जखमी होऊन जागीच ठार झाला. त्याच्यावर आज दि.१३ मार्च रोजी पिंडोनी स्मशानभूमित अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रमोदने तंत्रनिकेतनचे शिक्षण घेतले होते. त्याच्या पश्चात आई,वडील व भाऊ आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने