Top News

प्रतिबिंब वार्षिकांकाचे प्रकाशन.


Bhairav Diwase.    March 02, 2021

पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे सायन्स एज्युकेशन सोसायटी तर्फे प्रतिबिंब या हस्तलिखित वार्षिकांकाचे चे प्रकाशन करण्यात आले. सायन्स एज्युकेशन सोसायटी तर्फे महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अपर्णा धोटे, रसायन शास्त्र विभाग प्रमुख निलकंठराव शिंदे महाविद्यालय भद्रावती  तथा बोर्ड ऑफ स्टडीज चेअरमन रसायन शास्त्र, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली या उपस्थित होत्या.

       त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर हुंगे, डॉ. सुशील कुमार पाठक, प्रा. संतोष कुमार शर्मा, डॉ. विनोद कुमार, प्रा. सतीश पिसे हे मंचावर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयातर्फे प्रतिबिंब या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले. वार्षिकांकासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपले हस्तलिखित लेख प्रतिबिंब मध्ये प्रकाशित केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. अपर्णा धोटे यांनी विज्ञान दिवसाचे महत्व समजावून सांगितले. डॉ. सी. वी. रमण यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्याच प्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुधीर हुंगे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रा. बाळासाहेब कल्याणकर यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन सायन्स एज्युकेशन सोसायटी च्या समन्वयक डॉ. विनोद कुमार, सहसमन्वयक प्रा. वर्षा शेवटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक गण आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने