नगरपंचायतीने ठोठावला 50 हजार रूपयांचा दंड.
अहेरी:- लग्न समारंभ म्हटल तर गर्दी होणार. त्या मुळे राज्य सरकारने निर्बंध घातले. लग्न समारंभातुन कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या 25 जणांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ पार पाडण्याचा आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी अहेरी नगरपंचायतीने 50 हजार रुपयांचा दंड ठोठावल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
22 एप्रिल रोजी अहेरी नगरपंचायतीअंतर्गत येणाऱ्या चेरपल्ली वार्ड क्र.16 मध्ये सुरेश हनुमंतु आत्राम यांचे घरी आयोजित लग्नसमारंभास 50 ते 75 लोक उपस्थित होते. शासनाने कोरोनाचा झपाट्याने प्रसार होण्यास लग्नसमारंभातील गर्दी कारणीभूत असल्याचे लक्षात आल्याने लग्न समारंभावर कठोर निर्बंध लादले. आणि या निर्बंधाची पायमल्ली केल्यास 50 हजार रुपयांची दंडाच्या रकमेची तरतुद केली. कारवाई झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास सोशल मीडियावर दंड आकारण्याचा फोटो व्हायरल झाला होता.
लग्न उपस्थिती नियमांची पायमल्ली केल्याने अहेरी नगर पंचायतीने सुरेश हनुमंतु आत्राम यांच्यावर 50 हजाराचा दंड ठोठावून कारवाई केली. या नियमानुसार ही गडचिरोली जिल्ह्यातील पहिलीच कारवाई असल्याचे नगरपंचायती चे मुख्याधिकारी श्री साळवे यांनी सांगितले.