🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

चंद्रपूर मध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस.


Bhairav Diwase. April 23, 2021

चंद्रपूर:- मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान काहीसं अस्थिर झालं आहे. राज्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा वाढत आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग दाटत आहेत. ऐन एप्रिलमध्ये अशा प्रकारच्या वातावरणामुळे शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण होतं आहे. असं असताना आज दुपारी चंद्रपूरला मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं झोडपलं आहे. आज सकाळपासून चंद्रपूरकरांना असह्य उकाड्याचा त्रास होतं होता. त्यानंतर आज दुपारी चंद्रपूरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं लावली हजेरी लावली आहे. राज्यातील तापमान वाढीस लागल्यानंतर या जोरदार पावसामुळं चंद्रपुरात काहीसं आल्हाददायक वातावरण तयार झालं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत