🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या.

दोन्ही मुले झाले पोरके.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- चारित्र्याच्या संशयावरुन पती-पत्नीच्या झालेल्या भांडणातून सर्वप्रथम पतीने लोखंडी राडणे पत्नीची हत्या केली. त्यानंतर घरीच गळफास घेऊन पतीने आत्महत्या केली. ही थरारक घटना आज शुक्रवारी (23 एप्रिल) ला पहाटेच्या सुमारास कोरपना तालुक्यातील कोडशी खुर्द येथे घडली. पत्नी अल्का सुनिल डवरे (26),सुनील मधुकर डवरे(35) असे मृतांची नावे आहेत.
पोलिस सुत्रानुसार, कोरपना तालुक्यातील कोळशी खुर्द येथील निवासी सुनील मधुकर डवरे हा रहिवासी होता. त्याला एक चार वर्षाची मुलगी तर एक सहा वर्षाचा मुलगा असा परिवार होता. काल मध्यरात्रीच्या मुले झोपल्यानंतर सुमारास पती पत्नी मध्ये पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन कडाक्याचे भांडण झाले. भांडण येवढ टोकाला गेल कि हत्या आणि आत्महत्या मध्ये झाले. पहाटेच्या सुमारास पत्नी अलका हिच्या डोक्यावर लोखंडी राडणे वार करून ठार मारले. त्यानंतर घरीच पती सुनील याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मुले झोपत असताना ही घटना घडल्याने त्यांना या बाबत अजीबात कल्पना नाही.
नेहमी प्रमाणे सकाळी उठून डवरे दांपत्य घरची कामे करताना दिसले नाहीत. त्यामुळे शेजा-यांना संशय आल्याने घरी जावून पाहिले असता, पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर पतीचा मृतदेह गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत होता.
सदर घटनेची माहिती सर्वप्रथम पोलीस पाटील यांना मिळाली. त्यांनी कोरपनाणा येथील पोलिसांना माहिती दिली. स्टेशनशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली. ठाणेदार अरुण गुरनुले हे आपल्या पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून प्रेत कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना करिता पाठविण्यात आले. मृत पती सुनील डवरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत